विवेक तोटेवार, वणी: सध्या तेली फैल हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. या परिसरातील बराचसा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. मात्र नुकतच या परिसरातील एक महिला अंत्यसंस्कारासाठी एक महिला घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती पॉजिटिव्ह आढळून आली होती. त्यामुळे 64 जणांना प्रशासनाने कॉरन्टाईन केले होते. त्यासोबतच हातावर होम कॉरन्टाईनचा शिक्का मारल्यानंतरही अनेक लोक घराहेर पडत आहे तसेच प्रतिबंधीत क्षेत्रातून बाहेर निघत आहे. अशा नियम तोडणा-या व्यक्तींवर आता प्रशासनाने कठोर पावलं उचलत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांवर या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम 269 व 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना पॉजिटीव्ह व्यक्तीला आयसोलेट करण्यात येत असून ती व्यक्ती राहत असलेल्या क्षेत्राला कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जाते. तसेच बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून व परदेशातून आलेल्या व्यक्तींना होम कोरोन्टाईन केले जात आहे. परंतु होम कॉरन्टाईन व्यक्ती किंवा प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती बाहेर फिरतांना दिसून येत आहे. अशाप्रकारे बाहेर निघणा-यांवर पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. शिवाय अशा व्यक्तीबाबत वणी पोलिसांना माहिती देण्याचे आव्हाहन वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी वाणीकरांना केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातून कुणी बाहेर निघत असल्यास माहिती द्यावी – ठाणेदार
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केला जात आहे. परंतु काही व्यक्ती कोरोनासंदर्भात दिलेले मार्गदर्शक तत्व व नियमांचा भंग करताना आढळून येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती किंवा होम कोरोन्टाईन असलेले कुणी जर फिरताना आढळून आल्यास त्याची माहिती वणी पोलिसांना दयावी. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. याकरिता वणी पोलीस ठाणे फोन नंबर 0723922507 किंवा पोहवा मेघावत (8805144655) या नंबरवर संपर्क साधावा. अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात येईल.
– वैभव जाधव, ठाणेदार