ड्रायव्हिंग स्कूलवर आर्थिक संकट, आर्थिक सवलती देण्याची मागणी
जनहित ड्रायव्हिंग स्कूल संचालक महासंघाचे निवेदन
जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे इतर व्यवसाय व सेवासह ड्रायव्हिंग स्कूलला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलवर आलेल्या आर्थिक संकटावर विचार करून ड्रायव्हिंग स्कूलला विविध आर्थिक सवलती आणि सूट देण्याची मागणी जनहित ड्रायव्हिंग स्कूल संचालक महासंघाने केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना संक्रमण व लॉकडाऊनमुळे 22 मार्च पासून आम्ही आमची सर्व ड्रायव्हिंग स्कुल बंद ठेवले, प्राशिक्षण सुद्धा बंद ठेवले व पुढे अनिश्चिीत काल बंद राहण्याची शक्यता दिसते. प्रत्येक स्कुलकडे कमीतकमी पाच ते पंधरा कर्मचा-यांचा स्टॉफ असतो. सर्वाना पगार देणे गरजेचे आहे, कारण ड्रायव्हिंग शिकवणी ही कला (स्कील) आहे. ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. असा कुशल स्टॉफ वा-यावर सोडून देता येत नाही.
तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे वाहनावर बॅकेचे कर्जाचे ओझे आहेत. त्यामुळे प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल चालक आर्थिक डबघाईस आला आहे. या पुढे आणखी आठ-दहा महिने तरी हा व्यवसाय सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटापासून ड्रायव्हिंग स्कूलना थोडा फार धीर देण्यासाठी काही उपाय योजना करणे गरजेचे आहे.
यासाठी कामे सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षा पर्यंत ट्रेनिंग वाहनांना सवलतीच्या दरात इंधन (डिझेल-पेट्रोल) पुरवठा व्हावा, जसे लघु उद्योग व कुटीर उद्योगांना कमी व्याज दरात खेळते भांडवल रोख (आर्थिक पुरवठा) दिला जातो, तसाच बँका मार्फत किंवा जिल्हा उद्योग माध्यामातून रोख स्वरूपात कर्ज उपलब्ध व्हावे, राज्य शासनाकडून सरकार मान्यता प्राप्त ट्रेनिंग स्कुल ला रोख रक्कम आर्थिक सहाय्यता देण्यात यावी, लॉकडाऊन उघडे पर्यंत सर्व अनुज्ञाप्ती (कच्चे-पक्के) ची वैद्यता वाढवून देण्यात यावी,
लॉकडाऊन उघडल्यावर अतिरिक्त मोटार वाहन निरीक्षकांच्या डुयटी लावून पक्के अनुज्ञाप्ती चे चाचणी चा कोटा दुप्पट करण्यात यावा. लॉकडाऊन उघडल्यावर TR संवर्गातील चाचणी करीता नमुना 5A व नमुना 5 मॅन्युअल मान्य करण्यात यावा, तालुका स्तरावरील कँम्पची संख्या वाढवुन बंद कालावधीचे कामे उरकुन देण्याकरीता लर्निंग व परमन्ट ड्रायव्हिंग लायसंसचा कोटा वाढविण्यात यावा,
ज्या ईतर व्यवसायांना नियम व शर्तीच्या अधिन राहुन परवानगी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलला देण्याची मागणी कोर कमेटीचे अध्यक्ष संतोषकुमार जयस्वाल व सचिव धम्मशिल बोरकर यांनी केली आहे.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.