कलावंतांना आर्थिक मदत द्या

कलावंत न्याय हक्क समितीची मागणी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान कलावंतांचे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. प्रत्येक कलावंतांना 50 हजार प्रमाणे आर्थिक मदत द्यावी ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती मारेगाव तालुका शाखेने तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य सरकारने 22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन अमलात आणले. त्यामुळे ऐन सिझन मध्ये कलावंतांचे सर्व कार्यक्रम बंद असल्याने कलावंताच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोविड – 19 या जागतिक महामारीमुळे सगळ्याच सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या नियमाचे सर्वच कलावंत पालन करत आहेत. राज्यातील सर्वच कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याची दखल वंचीतचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी घेऊन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेतली.

कलावंतांच्या विषयावर चर्चा करून आर्थिक मदतीच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी तालुका संपर्क प्रमुख रविकिरण घुमे, अनंत सुर्तेकर, रवी कामटकर, चंद्रभान मडावी, प्रदीप गजताप, सुनील गेडाम, विठ्ठल गेडाम, संजय मेश्राम, रवींद्र काळे आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.