मंदर येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

प्रकृती चिंताजनक, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

0

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदर येथील एका शेतगड्याला दि. 7 सोमवारी दुपारी सर्पदंश झाला. महादेव मडावी (38) असे शेतगड्याचे नाव आहे. मंदर येथील शेतकरी मनीष बोढे यांच्या शेतात कपाशीवर कीटकनाशक फवारणीचे काम सुरू होते. तेव्हा ही घटना घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फवारणी करताना महादेवच्या पायाला सर्पदंश झाला. मालकाने त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला. मात्र महादेवला वणीतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.