बूट हाऊसला आग, वेळीच आग विझवल्याने मोठी हानी टळली

शहरातील दीपक चौपाटीजवळील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा रोडवरील दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील एका जोडे-चप्पलच्या दुकानाला आग लागली. ही घटना आज रविवार दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली. नगरपरिषद अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तो पर्यंत दुकानातील काही माल व पाण्याची कॅन जळून खाक झाली होती. या आगीत बूट हाउसचे तब्बल 50 हजारांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकाचे म्हणणे आहे.

प्राप्त माहितीनुसार दीपक टॉकीज चौपाटीवर सजाब दाऊद शेख यांचे दोस्ताना बूट हाऊस या नावाने जोडे चप्पल विक्रीचे दुकान आहे. लॉकडाउनमुळे सध्या दुकान बंद आहे. रविवार 30 मे ला सायंकाळी 7 वाजता दरम्यान दुकानातून धूर निघत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. आग लागल्याचे निदर्शनास येताच लगेच अग्निशामक विभागाला याची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच अग्निशामक वाहन चालक देविदास जाधव अग्निशमन वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. फायर फायटरच्या मदतीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत दुकानातील काही मालासह इतर साहित्य जळाले होते. आगीच्या घटनेबाबत दुकान मालक सजाब दाऊद शेख रा. वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हे देखील वाचा:

कोरोनातही जुगार जोमात, शिरपूर व गोपालपूर येथे छापा

आज तालुक्यात 9 रुग्ण, रॅपिड ऍॅन्टीजनमध्ये सर्व निगेटिव्ह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.