शहरातील अनेक खासगी शाळेत अग्निशामक यंत्रणाच नाही

शाळेची तपासणी करण्याची भाजयुमोर्चाची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील खासगी शाळेतील अग्निशामक यंत्रणा व बांधकाम परवानगीची तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आली. याबाबत भाजयुमोचे जिल्हा महामंत्री निखिल खाडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. गेल्या आठवड्यात भाजयुमोच्या काही सदस्यांनी खासगी शाळेची पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळून आले. तसेच शाळेत अग्निशामक यंत्रणा आढळून आली नाही. सदर बाब ही विद्यार्थ्यांच्याच नाही तर कर्मचारी यांच्यासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील सर्व खासगी शाळेचा सर्वे करून शाळेतील अग्निशामक यंत्रणा व बांधकाम परवानगीची पाहणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी युवा मोर्चाचे निखिल खाडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, दीपक पाऊणकर, सारंग बिहारी, शुभम राजूरकर, कार्तिक पटेल, श्रेणिक मुथा इत्यादींची उपस्थिती होती.

Comments are closed.