ग्रामीण रुग्णालय परिसरातील डीपीने घेतला पेट, रुग्णालय अंधारात
ट्रकची इलेक्ट्रिक पोलला धडक, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
जितेंद्र कोठारी, वणी: रिव्हर्स घेणा-या एका ट्रकने इलेक्ट्रिक पोलला जबर धडक दिली. या धडकेमुळे नजिक असलेल्या डीपीने अचानक पेट घेतला. ग्रामीण रुग्णालय परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. डीपी जळाल्याने ग्रामीण रुग्णालयाची लाईट गेली असून संपूर्ण ग्रामीण रुग्णालय अंधारात गेले आहे.
सध्या वणीतील ग्रामीण रुग्णालयात बांधकाम सुरू आहे. संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात एक ट्रक (MH 29 BE0692) रेती घेऊन आला होता. रेती टाकण्यासाठी गाडी रिव्हर्स घेताना ट्रक इलेक्ट्रिक पोलला धडकला. यामुळे पोल वाकला. मात्र याचा परिणाम जवळच असलेल्या डीपीवर होऊन डीपीने लगेच पेट घेतला.
दरम्यान डीपी खालील झाडे जळाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील व रुग्णालयातील कर्मचा-यांनी त्वरित सदर आग विझवली. या आगीत नुकसान झाले नसले तरी डीपीला आग लागल्याने रुग्णालयाची लाईट गेलेली आहे.
ग्रामीण रुग्णालय अंधारात
डीपी जळाल्याने संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची लाईट गेली आहे. सध्या इनव्हरटरच्या मदतीने काही बल्ब सुरू करण्यात आले आहे. मात्र यामुळे आणखी अवघे दोन तास लाईट सुरू राहण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहे. डीपीचे काम सुरू असून दोन तासांमध्ये लाईट येण्याची शक्यता न दिसल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार यांनी दिली.
हे देखील वाचा:
Comments are closed.