जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील पंचशील नगरमध्ये एका घराला आज दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक लोकांनी आणि अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान आग विझवताना एकाला विजेचा धक्काही लागला. मात्र त्याची प्रकृती स्थीर आहे.
सविस्तर वृत्त असे की पंचशील नगरच्या मागच्या परिसरातील होस्टेल जवळ शेख इस्राईल शेख हमजा यांचे घर आहे. त्यांचा गादी बनवण्याचा व्यवसाय आहे. त्या घरासमोर मोठ्या प्रमाणात कचरा आहे. आज दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने हा कचरा जाळला होता. दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास कच-याने अधिकच पेट घेतला.
ही आग वाढत जवळच असलेल्या शेख इस्राईल यांच्या घरापर्यंत पोहोचली व घरातील गाद्यांनी पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच घराजवळील लोकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेख रज्जाक यांना विजेचा धक्का ही बसला. मात्र त्यांची प्रकृती स्थीर आहे. स्थानिकांनी याबाबत अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशामन दलाचे जवान देविदास जाधव, फायटर शाम तांबे व फायटर दीपक वाघमारे हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.
या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी शेख इस्राईल यांच्या घरातील गाद्या, गॅस शेगडी, टीव्ही, दिवान, कपडे इत्यादी वस्तू आगीच्या भक्षस्थानी आल्याने त्यांचे सुमारे 20 ते 25 हजारांचे नुकसान झाले आहे. परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने घराजवळील कचरा जाळल्याने ही आग लागल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.