बहुगुणी डेस्क, वणी: जि. प. प्राथमिक शाळा चोपण येथे अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. एखादा नेता किंवा शाळेतील मुख्याध्यापक यांच्याद्वारे ध्वजरोहण करण्यात येतो. मात्र या गोष्टीना फाटा देत या शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांकडून ध्वजारोहण करण्यात आले.
व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन जोगी यांनी ध्वज फडकविण्याचा मान एका मुलीला दिला. कु. आरती येरमे या मुलीने ध्वजारोहण केले. यावेळी मंचावर केवळ बाल मंत्रीमंडळच होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून कु. आरती येरमे यांची निवड करण्यात आली होती. तर प्रमुख पाहुणे सरपंच म्हणून नंदाताई थेरे बाल मुख्यमंत्री प्रथमेष जोगी, उपमुख्यमंत्री मन मत्ते व बाल मंत्रिमंडळ यावेळी मंचावर उपस्थीत होते.
या वेळी शाळाव्यवस्थापन अध्यक्षांनी व समितीच्या सदस्यांनी मंच्यावर न बसता खाली बसून मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपसरपंच अजय आसुटकर गावातील सेवा निवृत्त शिक्षक मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका मुलीला ध्वजारोहनाचा व अध्यक्ष पदाचा मान देऊन खऱ्या अर्थाने ‘बेटी बचाओ’ हा नारा सार्थ केला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गणेश भोयर, परचाके, काळे, बोखरे, उताणे इत्यादी शिक्षक तर अंगणवाडी सेविका थेरे, सारवे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन कु. मानसी ढोकेनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक उताणे यांनी केले.