जोतिबा पोटे, मारेगाव: संकटकाळी धावतो तोच खरा वाली, याचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी गावोगावी जाऊन मदत जमा करुन माणुसकी धर्म जागवला. त्यांच्या या कृतीने पुरात सापडलेल्या अनेक पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. गेल्या पंधरवाड्यात सांगली ,कोल्हापूर व गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड मधील पुरग्रस्ताना मारेगाव तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांना माणुसकी धर्म जागवत तालुक्यातील अनेक गावांतून मदत जमा करीत आहेत.
पुरग्रस्तासाठी आवश्यक असलेले कपडे, गहू, तांदूळ १०० क्विंटल आणि २२,००० रु रोख स्वरूपात मदत करुन एक सामजिक दायित्व पार पाडल्याचा अनुभव तालुका वासियांना आला. ही मदत यवतमाळला गुरूदेव सेवा मंडळाच्या सहकार्यातून शक्य झाली. या मदतीसाठी गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी अनिल नावडे, उपसेवाधिकारी गोविंद ठावरी, बंडू रोगे, रुपेश ढोके, पांडुरंग कालेकर, धनराज ढवस, रामभाऊ दरेकार, व्हि.व्हि.टोंगे, विजय गोहोकर, बंडु टोंगे, मनीषा टोंगे, विठ्ठल बोढाले यांसह असंख्य गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी ‘एक हात मदतीचा’ कार्यक्रमात परिश्रम घेतले.