मुस्लिम समाजातर्फे ‘जकात’द्वारा गरजूंना मदत

रमजान निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांची विविध भागात मदत

0

जब्बार चीनी,वणी: इस्लाम धर्मातील रमजान हा पवित्र महिना आहे. या महिन्यात ‘जकात’ या प्रथेला फार महत्त्व आहे. या महिन्यात वर्षभरातील बचतीतील अडीच टक्के भाग हा गोरगरीब व गरजवंताना दिला जातो. सध्या कोरोनामुळे लोकांवर संकटं आली आहेत. रमजान सारख्या पवित्र महिन्यात गरिबांची चूल पेटावी यासाठी जकातचाच एक भाग म्हणून मुस्लिम समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते झटत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या राणानूर सिद्धीकी व रज्जाक मंजील परिवारातर्फे गोरगरीब व गरजवंतांना शास्त्री नगर, फुकटवाडी, मोमीनपुरा इत्यादी भागात अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जमीर खान व मित्र परिवाराकडून मोमीनपुरा व फुकटवाडीत जवळपास एक हजार कुटुंबांना किराणा मालासह फळे व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.

कब्रस्तान कमेटी कडुन पंचशील नगर, शास्त्रीनगर, रजानगर, मोमीनपुरा ईत्यादी ठिकाणी रोज 25 परिवाराला अन्न धान्याची कीट देण्यात येत आहे. सध्या संपूर्ण देशात करोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे. या आपात्कालीन स्थितीमध्ये देशातील गरीब कुटुंबांची परवड टाळण्यासाठी सर्व वणीकर सरसावले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.