पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील मॅकरून स्कूल तर्फे शाळेतील तसेच बाहेरील 100 चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्गाला धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शनिवारी मॅकरून स्कूलचे संचालक पीएस आंबटकर यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका शोभन मेश्राम यांच्या तर्फे या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहु, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहेत.
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे रोजगार बंद असल्याने त्याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मजुर, हमाल, व्यावसायिक यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनाही याची मोठी झळ बसली आहे. ही बाब लक्षात घेऊन वणीतील मॅकरून अकाडमी तर्फे अऩ्नधान्याच्या किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
शनिवारी वणीत मॅकरून अकाडमीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच इतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांना अन्यधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यासाठी अजय कंडेवार, संगीता पवार, गौरी पुल्लजवार यांनी सहकार्य केले.