मुकुटबन वनविभागा तर्फे वृक्ष लागवड कार्यक्रम

२ लाख ६६ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य 

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन वनविभागातर्फे रविवारी १ जुलैला सकाळी ९ वाजता भेडाळा कक्ष क्र ३१ बी मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. १ ते ३१ जुलै च्या कालावधीत ग्रामपंचायत तसेच शासकीय विभागांना रोपांचे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या कालावधीत वनविभागासह शासकीय, अशासकीय संस्था ग्रामपंचायत, नगरपंचायत विभाग यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहे.

तालुक्यात माथार्जुन येथील रोपवाटिका मध्ये 77 हजार 609, बेलमपेल्ली येथे 26 हजार 906 रोपे, तसेच सामाजिक वनीकरण विभागातील हिवरा बारसा रोपवाटिकेत 43 हजार 230 ही 18 महिन्यांवरील मोठी रोपे तयार करण्यात आली आहे. तालुक्यात 2 लाख 68 हजार 222 रोप वृक्ष लागवड होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वेगवेगळ्या जातीचे वृक्ष लागवड करण्याच्या उद्धिष्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी १ जुलै पासून सुरू होणार असून 31 जुलैपर्यंत वृक्ष लागवड कार्यक्रम चालणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगीता मानकर, तहसीलदार रामचंद्र खिरेकर, ठाणेदार धनंजय जगदाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, सरपंच लीनेश सातपुते, सुरेश मानकर, सुशील ओझा, श्रीकांत चामाटे, मसराम, प्रवीण नागतुरे, यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी वनरक्षक, पोलीस कर्मचारिसह गावकरी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.