कायर रोडवर चार चाकी वाहन जळून खाक

0

विलास ताजने (मेंढोली)- वणी ते कायर मार्गावर नवरगाव जिनिंग जवळ श्रीहरी म्हसे यांच्या शेताजवळ एका अल्टो कंपनीचे चार चाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना (दि३०) सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी तालुक्यातील कायर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गंगाधर बलकी यांच्या मालकीची कार असल्याचे समजते. बलकी हे वणी वरून कायर येथे जात होते. प्रत्यक्ष दर्शीच्या मतानुसार पंचर कार चालवीत असल्याने गाडीच्या टायरने पेट घेतला. मात्र सदर बाब वाहन चालकाच्या लक्षात आली नाही.
एवढ्यात मागावून येणाऱ्या काळी पिवळीच्या चालकाने सदर गाडीला ओव्हरटेक करून बाब लक्षात आणून दिली. बलकी हे वणी येथील संतधाम परिसरात राहते.घटनेच्या वेळी बलकी स्वतः कार चालवीत होते. काळी पिवळीच्या चालकाच्या सतर्कते मुळे प्राणहानी टळली.
Leave A Reply

Your email address will not be published.