Breaking News – जीवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतमजूराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात जमीनीवर पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतमजुराचा मृत्यू झाला. सदर घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत खांदला शेत शिवारात बुधवार 28 जून रोजी दुपारी 3 वाजता घडली. शंकर केशव दुरुतकर (40) रा. शिरपूर असे मृतक मजुराचा नाव आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतमजुराचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त शिरपूर येथील नागरिकांनी मृतदेह शिरपूर येथील महावितरण कार्यालयात आणले असून तणावाचे वातावरण असल्याची माहिती आहे. 

प्राप्त महितीनुसार शिरपूर येथील शेतकरी प्रशांत ठमके याच्या शेतात काम करीत असताना शेतमजूर शंकर दुरुतकर यांना जमिनीवर पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला. विद्युत तारांमध्ये वीजप्रवाह सुरु असल्यामुळे शंकर याला विजेचा जोरदार धक्का बसला व तो जागीच गतप्राण झाला. काही दिवसांपूर्वी लाठी गावातील पीयूष माहुरे या बालकाला जीवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे शेतात विद्युत तार अनेक दिवसांपासून जमिनीवर पडून असल्याबबत शेतमालकाने महावितरण कार्यालयात लेखी व तोंडीत कळविले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतमजूराचा हकनाक मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करीत आहे. मृतक शेतमजूर शंकर दुरुतकर याच्या मागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा आहे.

Comments are closed.