वणीत मोफत एक्यूप्रेशर, वाईब्रेशन व सुजोक चिकित्सा शिबिर

आनंद भवन येथे 4 ते 9 फेब्रुवारी पर्यंत होणार शिबिर... श्री वर्धमान श्वे. स्था. जैन श्रावक संघ व जैन सोशल ऑर्गनायझेशनचा संयुक्त उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात विविध आजाराने ग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दि. 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत मोफत एक्यूप्रेशर, वाईब्रेशन व सुजोक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जैन स्थानक जवळ आनंद भवनमध्ये 6 दिवस हे शिबिर चालणार आहे. श्री वर्धमान श्वे. स्था. जैन श्रावक संघ व जैन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित या शिबिरात राजस्थान येथील एक्यूप्रेशर तज्ञ विना औषध उपचार करणार आहे.

या शिबिरात ब्लडप्रेशर, शुगर, लठ्ठपणा, संधिवात, घुडघ्याचे दुखणे, मायग्रेन, मूळव्याध, कान, नाक व घसाचे दुखणे, मानसिक ताण, हातापायात मुंग्या येणे इत्यादी आजारांवर एक्यूप्रेशर, वाईब्रेशन व सुजोक थेरेपीने उपचार केल्या जाणार आहे.

6 दिवसाच्या शिबिरासाठी व उपचाराकरिता फक्त शंभर रुपये भरून नोंदणी करावी लागणार आहे. शिबिरात राजस्थान येथील थेरेपिस्ट राजेंद्र सारण व टी. एच. चौधरी रुग्णांवर उपचार करणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वर्धमान श्वे. स्था. जैन श्रावक संघ, वणी व जैन सोशल ऑर्गनायझेशन तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहिती व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा –
विजय मुनोत – 9823107319
विनोद मुथा – 9850304901
विजय भंडारी – 9422866305
विशाल डुंगरवाल – 9422921844
मुकेश काठेड – 9921128662
अजय छल्लानी – 9823040309
जितेंद्र जांगडा – 9850830391
सुनील चिंडालिया – 9850554410

Comments are closed.