पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील पत्रकार संदीप बेसरकर यांचे वडील अशोक शिवाजी बेसरकर यांचे आज दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.15 वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासले होते. अशोक बेसरकर हे आदिवासी चळवळीशी जुळलेले होते. त्यांनी आदिवासी समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. याशिवाय ते अनेक सामाजिक कार्यतही सक्रीय असायचे. काही काळ त्यांनी पत्रकारिता देखील केली होती. अशोक यांच्या पश्चात एक मुलगा, सून, पत्नी, नातू असा आप्तपरिवार आहे. अशोक बेसरकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10.00 वाजता वणीच्या मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
