साक्षी वैद्यकीय सहायता केंद्र, लोढा व सुगम हॉस्पिटलद्वारा मोफत आरोग्य शिबिर
बहुगुणी डेस्क, भालरः बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर द्वारा संचालित साक्षी वैद्यकीय सहाय्यता केंद्र आणि लोढा व सुगम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलद्वारा भालर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर झाले. या शिबिरात स्त्रीरोग तपासणी डॉ. महेंद्र लोढा व डॉ. वीण चवरडोल, हृदयरोग व मधुमेह तपासणी डॉ. गणेश लिमजे, डॉ. दिलीप सावनेरे यांनी, अस्थिरोग तपासणी डॉ. सुबोध अग्रवाल यांनी, बालरोग तपासणी डॉ. सुनील जुमनाके यांनी, सर्जरी तपासणी डॉ. किशोर व्यवहारे यांनी तर कान, नाक व घसा तपासणी डॉ. कमलाकर पोहे यांनी केली.
या शिबिरात शेकडो शिबिरार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी झाली. गरजुंना मोफत औषधी देण्यात आल्यात. यावेळी आयोजकांनी उपस्थितांशी संवाद साधला. शिबिरार्थ्यांशी बोलताना डॉ. लोढा म्हणाले की, नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहायला हवे. किरकोळ दुखणे आले तरी लगेच तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. खेड्या-पाड्यांतील रुग्णांना आपल्या आरोग्याच्या विविध तपासणींसाठी शहरात यावे लागते.
हा खर्चदेखील त्यांना परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे खेड्यापाड्यांमधूनच अशा शिबिरांचं नियमित आयोजन करण्याचा मानस यावेळी त्यांनी बोलून दाखविला. शेकडोंच्या संख्येत रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आयोजकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.