अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवड्यात 35 पॉझिटिवह रूग्ण आढळल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 268 वर पोहचली आहे. त्यानिमित्ताने प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. नवीन आढळलेले 35 रुग्णपैकी 28 रूग्ण हे शहरातील हॉटस्पॉट असलेल्या हनुमान वॉर्डातील व 7 रूग्ण महादेव नगर येथील असल्याचे कळते आहे. या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र यांना कॉन्टाईन करण्यात न आल्याने ते परिसरात मुक्त संचार करत असल्याचे समोर आल्याने शहरात दहशत पसरली आहे.
शहरातील मस्जिद वार्ड नंतर हनुमान वार्ड हा शहरातील हॉटस्पॉट बनला आहे काल आलेल्या अहवालात दि. 31 जुलै व 1 ऑगस्टचा स्वॅब घेतलेल्या एकाही व्यक्तीला प्रशासनाकडून होम कॉरन्टाईन राहण्याचे आदेश अथवा सूचना देण्यात आली नव्हती. पॉझिटिव आलेल्या रुग्णांपैकी जवळरपास सर्वच जण शहरात मुक्त पणे सचार करत होते. शनिवारी रात्री उशिरा अचानक अहवाले आले व त्यात 35 व्यक्ती पॉझिटिव आल्याने हनुमान वार्ड परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमान वार्ड परिसर आधी आलेल्या पॉझिटिव रुगांमुळे सिल करण्यात आला होता. त्या भागासह परिसरातील इतर नागरिकांचे टेस्ट करण्यात आले. मात्र सिल केलेल्या भागासह टेस्ट करण्यात आलेल्या इतर नागरिकांचा शहरात मुक्त संचार होता. शिवाय टेस्ट घेतलेले व्यक्ती कॉरन्टाईन आहे की नाही हे पाहण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप शहरातून होत आहे.
शहरात कोरोनासह डेंग्यूचीसुद्धा लागण सुरू झाली आहे. मात्र नगर परिषदेचे मोठे अधिकारी हे सध्या ठेकेदारांसोबत मधूर संबंध करण्यात मशगुल आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना नेताना त्यांचा रुग्णवाहिकेजवळ उभे राहुन फोटो काढण्यात धन्यता मानूण सोयीसुविधांकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.
संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याचे आव्हान
पॉजिटिव्ह आलेले 35 शहरात मुक्त संचार करत होते. ते अनेकांना भेटले. त्यांचा रिपोर्ट येताच त्यांच्या संपर्कात येणा-यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जर प्रशासनाचा असाच बेजबाबदारपणा सुरू राहिला तर एक दिवस संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात यायला वेळ लागणार नाही.