वणीकरांसाठी बुधवारी एक दिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन
जितेंद्र कोठारी, वणी: योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वणीकर जनतेसाठी बुधवारी 21 जून रोजी एक दिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.बी.लॉन मध्ये सकाळी 5.30 वाजता हे शिबिर सुरू होणार आहे. भारत स्वाभिमान ट्रस्ट आणि पतंजली योग समिती यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिबिरामध्ये योग प्रशिक्षकाकडून सूर्य नमस्कार, योगासने आणि सामान्य योग प्रोटोकॉलचे सराव करून घेण्यात येणार आहे. तरी सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थीवर्ग व वणीकर महिला, पुरुषांनी या निःशुल्क योग शिबिराचे लाभ घ्यावा. तसेच योग अभ्यासासाठी आपले स्वतचे आसन सोबत आणावे. असे असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
निःशुल्क योग शिबिरात भाग घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रा.महादेव खाडे- 8275297211.
लक्ष्मण इद्दे – 8275299896
गुलाब निते – 8275301866.
रमेश बोबडे – 9421986303
विजया दहेकर – 9923301744.
मायाताई माटे – 7620035842
लताताई थेरे – 9404279686
संजय आस्कर – 8380079192
वसंत उपरे – 9552325615
सुधाकर गारघाटे – 902117203
Comments are closed.