गंगुबाई काठियावाडी वणीत सुजाता थिएटरमध्ये रिलीज…
संजय लीला बन्साली व आलीया भट वणीकरांच्या भेटीला.... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550
बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला बन्सालीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट आजपासून रिलिज होत आहे. सु्प्रसिद्ध लेखक हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन या पुस्तकावरून हा सिनेमा घेण्यात आला आहे. आलिया भट सह या सिनेमात आपल्याला शंतनू माहेश्वरी, विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पहवा हे देखील चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगण या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स म्हणून दर्शन देणार आहे. अजय देवगणने या चित्रपटात हाजी मस्तानची भूमिका वठवली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात संपूर्ण कुटुंबासह वणीकरांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
गंगुबाई काठियावाडी या कोण आहेत?
हा चित्रपट गंगा हरजीवनदास काठियावाडी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी असलेल्या एका महिलेच्या जीवनावर आधारीत आहे. नेहरुंना त्यांनी लग्नासाठी विचारून त्यावेळी त्यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी ५० ते ६०च्या दशकात मुंबईतील वेश्यागृह मालकांपैकी एक म्हणून स्वतःचे नाव कमावले. गंगुबाईंना त्यांच्या पतीने कामाठीपुरा येथील एका वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला विकले होते. कामाठीपुरा हा मुंबईतील सर्वात जुना आणि सर्वात प्रसिद्ध रेड लाईट एरिया आहे. पुढे जाऊन त्यांनी स्वत:चा कुंटणखाना चालू केला. तसेच वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्यास सुरुवात केली.
कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…
Comments are closed.