स्पायडर मॅन आलाये… ऍक्शन आणि रोमांचसाठी तयार राहा…

सुजाता थिएटरमध्ये लक्झरीअस वातावरणात पाहा स्मायडरमॅन: नो वे होम (हिंदीमध्ये)

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरहिरोंच्या सिनेमाची वाट बघत असणा-यांची आता प्रतीक्षा संपली आहे. स्पायडर मॅन सिरिजचा नवीन सिनेमा स्मायडरमॅन: नो वे होम आज रिलिज होतोय. वणीतील प्रेक्षकांना सुजाता थिएटरमध्ये एसी आणि लक्झरीअस वातावरणात आपल्याला फॅमिलीसह या मु्व्हीचा आनंद लुटता येणार आहे. जबरदस्त ऍक्शन आणि त्याला हलक्या फुलक्या कॉमेडीचा तडका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल. विशेष म्हणजे हा सिनेमा हिंदी भाषेत डबिंग आहे.

सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणेज या सिनेमात आपल्याला डॉक्टर स्ट्रेंज स्पायडर मॅची मदत करणार आहे. पीटर पार्कर (स्पायडर मॅन) चे जीवन पूर्ण पणे बदललेले आहे. मात्र त्याचे मित्र परिवार आणि त्याच्या आंटीवर मोठा फरक पडला आहे. या सर्व गोष्टी ठिक करण्यासाठी स्पायडरमॅन वेळेशी खेळणा-या डॉक्टर स्ट्रेंजची मदत घ्यायचे ठरवतो मात्र विलेन पुन्हा हजर होतो. त्यानंतर सुरू होता सिनेमाचा रोमांच. जो केवळ आपल्याला थिएटरमध्येच अनुभवता येणार.

2002 मध्ये पहिल्यांदा स्पायडर मॅन रुपेरी पडद्यावर आला. त्यानंतर स्पायडर मॅनचे अनेक सिजन आले. टॉम हॉलंड हा स्पायडरमॅनच्या रुपात सर्वप्रथम कॅप्टन अमेरिका: सिविल वॉर मध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिथे तो एक शाळकरी मुलगा होता. या सिनेमात तो कॅप्टन अमेरिकाचा सहकारी होता. स्पायडर मॅन: होम कमिंग हा स्पायडर हा स्पायडर मॅनच्या नवीन सिजनचा पहिला सिनेमा होता. यात टॉम हॉलंडने स्पायडरमॅनची भूमिका केली. त्यानंतर स्पायडरमॅन अॅव्हेंजरच्या इनफिनिटी वॉर मध्ये एक ऍव्हेंजर म्हणून स्पायडर मॅन दिसला. 2019 मध्ये स्पायडर मॅन: फार फॉर्म होम हा दुसरा सिनेमा आला. त्यानंतर आता स्पायडरमॅनचा तिसरा सिनेमा स्मायडरमॅन: नो वे होम येतोय.

ऍडवॉन्स बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले
स्मायडरमॅन: नो वे होम ने ऍडवॉन्स बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. फक्त ऍडवान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली आहे. काही ठिकाणी या सिनेमाचे तिकीट 2200 रुपयांपर्यंत विकल्या गेल्याची माहिती आहे. एकीकडे मोठ्या शहरामध्ये तिकीटांसाठी मारामारी पाहायला मिळत असताना वणीमध्ये मात्र प्रेक्षकांना सहज तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे याचा प्रेक्षकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटर तर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते (येथे क्लिक करा). व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

 

हे देखील वाचा:

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

Comments are closed.