थरार: 45 लाखांच्या दरोड्यातील आरोपीला राजस्थानमधून अटक

दरोडेखोराने चाकू काढताच पोलिसांनी रोखले पिस्तूल

जितेंद्र कोठारी, वणी: 20 मार्च 2021 रोजी भरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याकडून 45 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळालेल्या दरोडेखोरांपैकी एका आरोपीला वणी पोलिसांनी बुधवारी राजस्थान येथून अटक केली. ओमप्रकाश चेनाराम बिश्नोई असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून राजस्थान पोलिस दप्तरी हिस्ट्रीशीटर म्हणून त्याची नोंद आहे.

आरोपीला अटक करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यातील पथकाने जोधपूर पोलिसांच्या सहकार्याने ऑपरेशन राबविले. वणी पोलीस स्टेशन मधील एपीआय संदीप ऐकाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक दरोडेखोरांच्या शोधात राजस्थान पाठविण्यात आले. राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यातील एकलखोर गावातून त्याच्या राहत्या घरुन बुधवार 15 डिसेंम्बर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान आरोपी ओमप्रकाश याला अत्यन्त शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

असा घडला थरार…
पोलिसांना पाहताच आरोपी यांनी चाकू बाहेर काढला व चाकूचा धाक दाखविला. परंतु पोलिसांनी त्वरित आरोपीवर रिव्हॉल्व्हर रोखले. रिव्हॉल्व्हर बघताच आरोपीने चाकू खाली टाकला. पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीच्या घराच्या मागच्या बाजूने दाखल होणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कंपाउंड वॉलमध्ये प्रवाहित विजेचा शॉक लागला. मात्र त्यांनी त्वरित सावरून घरात प्रवेश केला.

दरोड्यातील सहभागी जितू नावाचा दुसरा आरोपी हा जोधपूर जिल्हा कारागृहात बंद आहे. त्या आरोपीची कस्टडी मिळविण्यासाठी बाळेश्वर न्यायालयात अर्ज दाखल करुन आज 16 डिसेंम्बर रोजी कारागृहातून ताब्यात घेण्यात येईल. त्यानंतर दोन्ही आरोपीना घेउन पोलीस पथक आज सायंकाळी वणीसाठी निघणार आहे. 

घटनेच्या तब्बल 8 महिन्यानंतर कुख्यात दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, हेडकॉन्स्टेबल गजानन गोडंबे, हेडकॉन्स्टेबल विशाल गेडाम, नापोका इमरान खान यांच्या पथकाने ही कामगिरी फतेह केली.

हे देखील वाचा:

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

स्पायडर मॅन आलाये… ऍक्शन आणि रोमांचसाठी तयार राहा…

Comments are closed.