फक्त 600 रुपयात करा शरीरातील 55 प्रकारचे टेस्ट

जितेंद्र कोठारी, वणी : भारतीय जैन संघटना, वणी तर्फे शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी एक दिवसीय फुल बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लोढा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटल मध्ये आयोजित या शिबिरात फक्त 600 रुपयात शरीरातील 55 प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे. शिवाय मळ, मूत्र, रक्त तपासणी पथोलॉजीपेक्षा तीन पट कमी दरात करुन मिळणार आहे. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वर्षातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. जर, तुमचे वय 50 किंवा 60 पेक्षा जास्त असल्यास या वयातील व्यक्तींनी वर्षातून दोनदा संपूर्ण शरीर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा पेथालॉजीमध्ये फुल बॉडी चेकअप खूप महाग असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ते परवडत नाही.

भारतीय जैन संघटनातर्फे आयोजित या बॉडी चेकअप शिबिरात CBC (17) + ESR लिक्वीड प्रोफाइल (7), HbA 1C (2), FBS (1), किडनी संबंधित चाचणी (7), आयरन (3), लिव्हर फंक्शन टेस्ट (11), थायरॉईड (3), व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी 3 अश्या 55 प्रकारच्या चाचण्या फक्त 600 रुपयांच्या नाममात्र शुल्क देऊन करता येणार आहे. 

या एक दिवसीय फुल बॉडी चेकअप शिबिरात नाव नोंदणी साठी भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष प्रफुल खिंवसरा, सचिव विजय भंडारी, डॉ महेंद्र लोढा, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. हितेश सूराणा, अंकुश कोटेचा, जितेंद्र जांगडा, आनंद झामड, अजय छल्लाणी, मुकेश काठेड, विनोद मुथा, शैलेश बनवट, चारुल झाबक, धवल कटारिया, तुषार नगरवाला, पंकज भंडारी, विशाल डुंगरवाल, सुनील चींडालिया यांच्याशी संपर्क करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.