रा. शाहू महाराज विद्यालयात गांधी जयंती साजरी

गांधीचे विचार आत्मसाद करणारा कायम यशस्वी होतो - अभय पारखी

बहुगुणी डेस्क, वणी: भारत आणि जगावर महात्मा गांधींचा प्रभाव बहुआयामी आहे. सत्य आणि अहिंसेच्या सामर्थ्याने जगातील बलाढ्य शक्तींना त्यांच्यापुढे नतमस्तक केले. त्यांच्या कार्याची महत्ता आजही शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते, याची शिकवण आपल्याला देते. जो विद्यार्थी गांधींचे विचार आत्मसाद करतो, तो कायम सत्याच्या व अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करीत यशस्वी होतो. असे मनोगत राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी यांनी व्यक्त केले.

शहरातील शाहू महाराज हिंदी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता टोंगे होत्या. गांधी व शास्त्री जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन व विचारांवर प्रकाश टाकला. यावेळी उत्कृष्ट भाषण करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. यावेळी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीश लखमापूरे यांनी केले. प्रस्ताविक श्रेया धोबे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन गंगारेड्डी बोडखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.