काय तुझ्या बापू देशात होते!

गांधीजयंती निमित्त स्पेशल कविता

0

बहुगुणी डेस्क, वणी: सर्व लिहिणाऱ्यांसाठी वणी बहुगुणी डॉट कॉमचा ‘बहुगुणी कट्टा’ ही हक्काची जागा आहे. आपले लेख, कविता यावर आपण प्रकाशित करू शकता. लाखो वाचकांपर्यंत आपलं साहित्य या माध्यमातून जातं. साहित्य युनिकोडमध्ये wanibahuguninews@gmail.com या मेलवर पाठवावं. सोबत आपला एक फोटोही.

शुक्रवारी गांधीजयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. त्यानिमित्त कवी सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांची स्पेशल कविता, खास ‘वणी बहुगुणी’च्या वाचकांसाठी.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काय तुझ्या बापू देशात होते

काय तुझ्या बापू देशात होते
दरोडेखोर साधूच्या वेषात होते

सत्याच्या माना खालीच होत्या
आणि खोटे सर्व त्वेषात होते

इतिहास होता ज्यांचा कधी गाजला
चरित्र त्यांचे केवळ अवशेषात होते

प्रसिद्धीचे नाटक असे रंगले की
हरेक पात्र हरेक प्रवेशात होते

पाण्यावाचून तो तडफडून मेला
म्हणे पुण्यतीर्थ हृषीकेशात होते

आग क्रांतीची धुमसतच होती
निखारेही चितेचे आवेशात होेते

भुके स्वप्न तव्यावरच करपले
जगणे उष्टावळीच्या लवलेशात होते

सुनील इंदुवामन ठाकरे

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.