अखेर कोरोनाविरोधातली ‘त्यांची’ १७ दिवसांची झुंज संपली

कोरोनायोद्ध्यांनी केलेत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार

0

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेली कोरोनाविरोधातली ‘त्यांची’ झुंज संपली. कोरोनाशी लढा देत असलेल्या एका कोरोनाबाधिताची अखेर गुरुवारी प्राणजोत मालवली आहे. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारी 1 ऑक्टोबरला मोक्षधाम येथे कोरोनायोद्ध्यांनी केला.

पाटाळा येथील कोरोनाबाधित एका वेकोली कर्मचाऱ्याचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. गेल्या 17 दिवसांपासून ते या आजाराशी लढत होते. या रुग्णाला हृदयरोग व बीपीचा त्रास असल्याची माहिती आहे. सुरवातीला आदिलाबाद येथे उपचार केल्यानंतर वणीत त्यांचा उपचार सुरू होता. शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.

सायंकाळी 4 वाजता वणीतील कोरोनायोद्ध्यांना याबाबत महिती मिळाली. पार्थिव 5 वाजताच्या सुमारास मृतदेह वणीतील मोक्षधाम येथे आणले. ज्या मृतदेहाला आप्तसंबंधी पाहण्यास घाबरतात व अंतिम संस्कारसुद्धा करीत नाही किंवा त्यांना परवानगी नाही. शा व्यक्तीचा मृतदेह हा कोरोनायोद्ध्यांनी उचलला. त्यांच्या मृतदेहावर दहनादी अंतिमसंस्कार केलेत.

वणीतील कोरोना योद्ध्ये भोळेश्वर ताराचंद, अनिकेत मोगरे, रोहित बिसमोरे, शैलेश ब्राह्मणे, शुभम करसे, अभिषेक ताराचंद यांनी डॉ विवेक गोफने यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनारुग्णाचा अंतिम संस्कार केला. समाजापुढे एक आदर्श ठेवला. कोरोनाकाळ म्हणजे मानवतेची कसोटीच आहे. याही काळात हे कोरोनायोद्धे जीवाची पर्वा न करता मानवतेचं पालन करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.