रविवारी वणीत ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान

सुप्रसिद्ध लेखक, अभ्यासक चंद्रकांत वानखेडे रविवारी वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी जयंती सप्ताह निमित्त वणीत रविवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी संध्या 6 वाजता शेतकरी मंदिर येथे गांधी विचारांचे प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांचे ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वणी विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार राहणार आहे.

कार्यक्रमात आमदार धीरज लिंगाडे यांचा सत्कार केला जाणार आहे. व्याख्यानानंतर आमदार धीरज लिंगाडे हे पदवीधर तरुणांशी शिक्षण, नोकरी इत्यादी पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा व प्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या विचारानेच देशाने आणि जगाने पुढे जायला हवे. आज देशात जी परिस्थिती आहे, जी द्वेशभावना देशात रुजवली जात आहे. अशा स्थितीत देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
– डॉ. महेंद्र लोढा, कार्यक्रम समन्वयक

चंद्रकांत वानखेडे यांची लेखक, पत्रकार, गांधीवादी कार्यकर्ते, शेती अभ्यासक अशी ओळख आहे. त्यांनी विविध पुस्तकाचे लेखन केले असून अनेक वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. यासह शेतीविषयक अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. शेतकरी, सामाजिक, फॅसिस्ट विरोधी इ. आंदोलनात ते सक्रिय राहिले आहेत. ‘गांधी का मरत नाही?’ हे त्यांचे पुस्तक सुप्रसिद्ध असून याविषयावर त्यांचे व्याख्यानही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.