हिप हिप हुर्रे…. गणेश चुरे ना-याने गुंजला प्रभाग 11 !

गणेश चुरे यांच्या रॅलीचा माहौल, प्रभागात तळपली बॅट...

बहुगुणी डेस्क, वणी: प्रभाग क्रमांक 11 च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एक हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून त्याकडे बघितले जात आहे. अपक्ष उमेदवार गणेश चुरे (बोधचिन्ह बॅट) यांनी आता संपूर्ण प्रभागात मुसंडी मारली आहे. हिप हिप हुर्रे गणेश चुरे हा नारा सध्या चांगलाच गाजत आहे. गणेश चुरे यांच्या रॅलीला मिळालेल्या शेकडो मतदारांच्या रॅलीमध्ये हिप हिप हुर्रेने चांगलाच माहौल तयार केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटाचे, सर्वच जाती धर्माचे लोकांनी या रॅलीत सहभागी होऊन तेच या प्रभागातील एकमुखी आवाज आहे हे दाखवून दिले. विशेषता या प्रभागात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच थेट लढत होणार आहे. 

गणेश रघुनाथ चुरे हे केवळ व्यवसायिक म्हणून नव्हे तर संघर्षातून उभे राहिलेले एक होतकरू तरुण ओळखले जातात. व्यावसायाच्या निमित्ताने तयार झालेला जनसंपर्क ही त्यांची एक जमेची बाजू आहे. वार्डातील प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे, अडीअडचणीत पाठिशी उभे राहणे या स्वभावामुळे यावेळी प्रभागातील नागरिकांनी त्यांना आग्रह करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दिलेला शब्द पाळत प्रभागातील नागरिक आता स्वयंस्फुर्तीने त्यांच्या प्रचारात उतरत आहेत. त्यांचे बॅट हे बोधचिन्ह आता घराघरात पोहचले आहे. यावेळी ते विजयाचा षटकार मारणार असा, आवाज सर्वत्र गुंजत आहे.  

हिप हिप हुर्रे… गणेश चुरे
गणेश चुरे यांच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रॅलीत हिप हिप हुर्रे गणेश चुरे हा नारा चांगलाच गाजला. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. सकाळी 10 वाजता सेवा नगर जवळील प्रचार कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर बिरसा मुंडा चौक, महांकाली मंदीर परिसर, भगतसिंग चौक, युवा जिम, गणेशपूर रोड, शिवनेरी चौक, श्वास हॉस्पिटल, सिद्धार्थ वसतीगृह, महाराष्ट्र बँक, टागोर चौक, विठ्ठल मंदिर, पटेल यांची गल्ली, संत जगनाडे महाराज चौक, माता मंदिर रंगारीपुरा असा संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. त्यानंतर प्रचार कार्यालयातच रॅलीची सांगता झाली. मतदारांनी ठिकठिकाणी प्रचार रॅलीचे स्वागत करीत फुलांची माळ घालत स्वागत केले व पाठिशी उभे राहणार असे वचन दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणेश चुरे यांच्या प्रचार रॅलीत शेकडोंचा सहभाग

धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत
निवडणुकीच्या या हाय व्होल्टेज वातावरणात प्रभाग क्रमांक 11 मध्ये आता खरी लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी रंगताना दिसत आहे. पैशाच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांनी स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांचा विश्वास हा जनशक्तीवर आहे. गणेश चुरे यांच्या प्रचारात उमटणारा उत्स्फूर्त जनसमर्थनाचा आवाज हेच दाखवून देतो की या वेळी मतदारांचा निर्णय हा पैशाच्या मोहजालात अडकलेला नाही. त्यांचे मत हे जनतेच्या प्रश्नांवर, विशेषतः पाणीटंचाईसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर आधारित आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची कसोटी नाही, तर जनशक्तीने धनशक्तीवर विजय मिळवण्याची निर्णायक संधी ठरत आहे.

पाणीटंचाईचा मुद्दा अग्रक्रमावर
प्रभाग क्र. 11 मधील सर्वात प्रमुख समस्या ही जुन्या पाईपलाइनमुळे होणारी पाणीटंचाई आहे. या समस्येमुळे नागरिकांना रोजच्या जीवनात मोठा त्रास सहन करावा लागतो. एका गल्लीत पाणी तर दुस-या गल्लीत अपुरे पाणी, अशी या प्रभागातील परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हा मुद्दा त्यांच्या अग्रक्रमावर राहणार आहे. “पाणी हे जीवन आहे, आणि मी या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, पुरेसा पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी झटणार,” असे मत गणेश चुरे व्यक्त करतात. 

Comments are closed.