खळबळजनक- अल्पवयीन मुलीवर गॅन्ग रेप, आरोपी नराधम गजाआड

निर्जन ठिकाणी नेऊन 3 नराधम तरुणाचे कृत्य

बहुगुणी डेस्क, वणी: एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी घुग्गुस रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी राजूर कॉलरी येथील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

पीडिता (16) ही एका दुकानात काम करते. तर आरोपी राहुल राकेश यादव (25) व शंकर यादव (28), शंकर उर्फ राकेश नामदेव भोसकर (24) हे सर्व राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. सोमवारी दिनांक 17 जून रोजी पीडिता ही रात्री दुकान बंद झाल्यावर टिळक चौक जवळ होती. दरम्यान सर्व आरोपींनी तिला गाठले व तिला ऑटोतून सोडून देण्याच्या बहाण्याने बसवले. त्यानंतर आरोपींनी ऑटो घुग्गुस रोडवर नेला. तिथे एका निर्जन स्थळी थांबून त्यांनी तिच्यावर अत्याचार केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अत्याचार झाल्यानंतर आरोपींनी मुलीला परत टिळक चौक येथे आणून सोडले. या घटनेमुळे हादरलेल्या मुलीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली. या प्रकरणी बुधवारी रात्री तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 376, 366, 506 व पोक्सोच्या विविध कलमान्वये नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्री उशिरा राजूर गाठत तिन्ही आरोपीला अटक केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्दगर्शनात सुरु आहे. 

Comments are closed.