विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वणीत राहणाऱ्या चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सुनिता (बदलेले नाव) ही दुस-या जिल्ह्याची रहिवाशी असून ती सध्या मारेगाव येथे शिक्षण घेत होती. 30 जून रोजी ती नंदीग्राम एक्सप्रेसन वणीत पोहचली. त्यावेळी तिच्याजवळ हा बाईकने तिच्याजवळ आला. ती करणला ओळखत होती. त्याने त्वरित आपला मोबाईल तिच्या पर्समध्ये टाकला व तिला त्याच्या बाईकवर बसवून वणीतील पाण्याच्या टाकीजवळ आले.
त्यानंतर त्याने तिला एका अज्ञात गोदाममध्ये नेले. त्या तरुणाने तेथील पहारेकऱ्याला 100 रुपये दिले व त्या ठिकाणी दुसऱ्या आपल्या मित्राला बोलावून त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. नंतर 8 दिवस म्हणजे 7 जुलै पर्यंत दुसरे दुसरे मित्रा बोलावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
या घटनेने ती हादरून गेली. सुनीताने भीतीपोटी कुणालाही ही घटना सांगितली नाही. शेवटी तिने याबाबत यवतमाळ येथील हेल्पलाईन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी 20 जुलै रोजी यवतमाळ येथून यवतमाळ येथून टीम आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिला संपूर्ण घटनाक्रम विचारला. त्यानंतर सुनिताने पोलिसात तक्रार देण्याचे ठरविले व वणी पोलीस ठाण्यात चारही आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
तिच्या तक्रारीवरून करण हरिभाऊ काळे (22) राहणार तेली फैल, आवेश सिद्धीक शेख (22) वणी, कस्तुरी उर्फ गोलू दिलीप मेश्राम (20) व मयूर सुरेश क्षीरसागर (24) वणी यांच्यावर कलम 376 (अ), 363, 366, 306 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील चारही आरोपीला वणी पोलिसांनी अटक केली आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, विजयमाला रिठे, विजय वानखेडे व डीपी पथकाने केली.