गंगा विहार रॉबरीचा छडा, 4 आरोपींच्या वर्धा येथून आवळल्या मुसक्या

अवघ्या दोन दिवसात केस सॉल्व... दोन संशयीतांच्या आधारावर इतर आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गंगा विहार जवळील रॉबरीचा उलगडा झाला असून या प्रकरणी वणी पोलिसांनी वर्धा येथून आणखी 4 आरोपींना अटक केली. या आधी पोलिसांनी मारेगाव येथून 2 संशयीतांना अटक केली होती. वर्धा येथील आरोपींकडून 3 लाख 12 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस पथकाचे कौतुक होत आहे. 

सोमवारी रात्री 9 वाजता अंकुश मोबाईल शॉपीच्या मालकाला चाकूचा धाक दाखवून 6 लाखांची रक्कम लुटारुंनी लुटली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच पोलिसांच्या कार्यवाहीला सुरवात झाली. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनचे तीन वेगवेगळे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार करण्यात आलेत. या पथकाद्वारे सर्वात आधी सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यात आले. तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांना दोन संशयीतांचा सुगावा लागला. यावरून पोलिसांनी गणेश दत्ता चौगुले वय २४ व शेख सलीम शेख हुसेन वय २६ रा. वार्ड क्र. 7 मारेगाव या दोन संशयीतांना अटक केली.

यांना सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांनीच त्यांचे वर्धा येथील इतर 4 साथीदारांना हाताशी धरून सदर गुन्हा केला असल्याची माहिती दिली. त्यावरून एलसीबीचे दोन पथके व वणी पोलिसांचे एक पथक चिखलदरा, अमरावती येथे रवाना झाले. तर दोन पथके वर्धा येथे रवाना झालीत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पथकाने वर्धा येथून 1) रितीक गणेश तोडसाम वय २४ वर्षे २) पियुष अरून नारनवरे वय १९ वर्षे दोन्ही रा. इतवारा बाजार पोलीस चौकी जवळ वर्धा जि. वर्धा ३) तौसीफ रज्जाक कुरेशी वय २५ वर्षे रा. आनंद नगर, रेल्वे पटरीचे बाजुला वर्धा जि. वर्धा ४) सुजल सुरेश पाटील वय १९ वर्षे रा. इतवारा बाजार पोलीस चौकी जवळ वर्धा जि. वर्धा यांना त्यांच्या राहत्या घरून अटक केली. आरोपींकडून ३,१३,५००/रु असे हस्तगत करण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे पो.स्टे. वणी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. कुमार चिंता स. पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप साो. अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यवतमाळ, अनिल बेहेराणी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी, यांचे मार्गदर्शनात पोउपनि/धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, पो.हे. कॉ विकास धडसे, गजानन डोंगरे, पोना/पंकज उंबरकर, पोकों/विशाल गेडाम, शाम राठोड, मो. वसिम, गजानन कुडमेथे, शंकर चौधरी पो.स्टे वणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील पो.हे.कॉ इकबाल शेख, विजय वानखडे, पो.कॉ संतोष कालवेलवार, अमोल नुनेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकार

पोस्टे मारेगाव येथील श्री शंकर पांचाळ पोलीस निरीश्वक पोस्टे मारेगाव, श्रेणी पोउपनि/प्रमोद जिडडेवार, पोहेकॉ आनंद अलचेवार, पोहेकॉ / अफझल पठाण, नापोकों / अजय वाभीटकर पोलीस स्टेशन शिरपुर माधव शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पोस्टे शिरपुर तसेच स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ चे स.पो.नि अजयकुमार वाढवे, पो.उप.नि धनंजय हाके, पो.हे.कॉ उल्हास कुरकुटे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे ना.पो.कॉ निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा येथील पोउपनि / अमोल लगड, सलाम कुरेशी, पोकों/सचिन इंगोले, हमीद शेख, प्रमोद पिसे, राजेश दिवसकर, श्रीकांत खडसे, रामकिसन इप्पर, आशिष मयुरी, उदय सोळंकी यांनी पार पाडली आहे.

Comments are closed.