वाजविल्यास तसेच मद्यपान करून धिंगाणा घातल्यास होणार कार्यवाही

मुकूटबन येथे ९ तर ग्रामीण भागात ४९ सार्वजनिक गणपतींची होणार स्थापना

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ गणपतीची स्थापना होणार आहे. मुकूटबन येथे ९, ग्रामीण भागात ४९ असे एकूण ५८ आहेत. एक गाव-एक गणपती २० गावांत स्थापना करण्यात येणार आहेत. गणपती उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता तसेच गावातील उपद्रवी लोकांवर नजर ठेवण्याकरिता तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभऊ नये याकरिता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धर्मराज सोनुने व पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे यांनी घेतली .

गणेश मंडळांनी डीजेवर बंदी आहे ते लाऊ नये, मद्यपान करून गणेश विसर्जन करू नये. गणपतीच्या मंडपात जुगार खेळू नये, गणेश मूर्ती बसविण्यापासून तर विसर्जन पर्यंत मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांनी काय करावे तसेच विसर्जन करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत ठाणेदार सोनुने व उपनिरीक्षक कापडे यांनी दिली.

विसर्जन करतेवेळी मद्यपान करून शांतता भंग करणारे किंवा इतर कृत्य करणाऱ्यांवर पोलीस पाटील यांनी लक्ष ठेवायला सांगितले. बैठकीत ग्रामपंचयात, वनविभाग व वीजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विसर्जनाच्या वेळेस गावातील लटकलेली केबल किंवा गणपतीच्या ट्रॅक्टरला केबलमुळे अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले. विसर्जन मार्गावर खड्डे असल्यास बुजवणे विसर्जन स्थळावर लायटिंग व इतर सुविधा ग्रामपंचायतने करावी अशा सूचना देण्यात आल्यात.

एक गाव एक गणपती

अर्धवन, पवनार,शिंधीवाडोना अडेगाव,तेजापूर,येडसी, झमकोला, सोनेगाव, बाळापूर, बोपापूर, मंगुर्ला, बैलमपूर, पिंपरड, मांगली ( नवीन ) गणेशपूर, कोसारा पिलकिवाढोना, साखरा व चीचघाट या गावात होणार असून या गावकऱ्यांनी एक गणपतीची स्थापना करून वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. एक गणपती असल्याने दोन पार्ट्या नाही. संपूर्ण गावकरी एकाच ठिकाणी येऊन पूजा अर्चना करतील. गावातील ९५% गावातील झगडे भांडण कमी झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कार्यवाहीस समोर जावे लागणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. सदर बैठकीत ४८ मंडळाचे अध्यक्ष व पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीचे नियोजन नीरज पातूरकर ,सुलभ उईके यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.