विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कळमना (बुद्रुक) येथील भास्करराव ताजने विध्यालयात २३ ते २५ जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विध्यार्थी, शिक्षक आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्दघाटन सरपंच शांताराम राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष भास्कर ताजने होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी मंगल गेडाम, मुख्याध्यापक आत्माराम ताजने, हरिभाऊ चिखले गुरुजी, गुंजेकर गुरुजी, बापूराव आसुटकर, रामचंद्र राजूरकर, पुरुषोत्तम बोबडे, देवराव कुमरे उपस्थित होते. प्रास्तविक शिक्षक बबन लखमापुरे तर संचालन दत्तू महाकुलकर यांनी केले.
आभार बोभाटे गुरुजी यांनी मानले. याप्रसंगी क्रीडा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला प्रदर्शनी, प्रश्न मंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सांघिक आणि वैयक्तिक खेळातील विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वीतेसाठी गोलाईत गुरुजी, खडसे मॅडम, दीपा थेटे, विध्यार्थी कल्याण मंडळाचे दीपक टंडन, प्रिया ठाकरे, आदित्य मुसळे, लुकिता काकडे, सविता भोयर, निकिता नक्षणे, शुभांगी उपरे, भाविक दुर्गे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.