शेतकरी मंदिरात आयटकच्या कामगार व कर्मचा-यांचा मेळावा
कॉ. अनिल हेपट यांना निवडून आणण्याचा मेळाव्यात निर्धार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शेतकरी मंदिर सभागृहात आयटक संलग्न सर्व युनियनच्या कामगार कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन आयटक राज्य सचिव श्याम काळे (नागपूर) यांनी केले. अध्यक्षस्थानी एम.एस.ई.बी वर्कर्स फेडरेशन व आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे होते. मार्गदर्शक म्हणून भाकपचे राष्ट्रीय कौन्सिलर तुकाराम भस्मे (अमरावती) संयुक्त खदान मजदूर संघ (आयटक) वणी क्षेत्रचे अध्यक्ष अनिल हेपट, जियाउल्ला खान, आशा गटप्रवर्तक युनियनच्या नीता सोयाम उपस्थित होते. मेळाव्यात कामगार कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्यावर चर्चा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाकपचे उमेदवार कॉ. अनिल हेपट यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मतदारसंघातील सर्व 300 बुथवर लवकरच बुथप्रमुख नेमण्यात येणार असून त्याच्या कामाला सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात विविध गावातील शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला. मेळाव्यातुन प्रचार कार्याची सुरूवात करण्यात आली.
मेळाव्याची प्रस्तावना कॉ.अनिल घाटे,संचालन कॉ.संजय भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.बंडु गोलर यांनी केले. मेळाव्याला वणी विधानसभा मतदारसंघातील हजारो कामगार,कर्मचारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.