सामान्य ज्ञान स्पर्धेत ओम मुसळे, प्रसेनजीत खैरे अव्वल

0

निकेश जिलठे, वणी: हेल्पिंग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 700 पेक्षा जास्त मुलांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा 28 जानेवारीला निकाल लागला आहे. यात ओम मुसळे आणि प्रसेनजीत खैरे अव्वल ठरले आहे.

ही सामान्य ज्ञान स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. पहिला गट हा वर्ग 5 ते 10 साठी होता. तर दुसरा गट हा खुला होता. ही स्पर्धा रंगनाथ स्वामी मंदिरात घेण्यात आली होती. तसंच अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंग विद्यालय लालगुडा येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. तर ग्रामीण भागात पेटुर, निंबाळा या शाळेत घेण्यात आली होती.

वर्ग 5 ते 10 या गटात पहिले बक्षीस जनता शाळेतील ओम सुनील मुसळे याला मिळाले आहे. त्याला 3000 रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ओम वर्ग ७चा विद्यार्थी आहे. याच गटात द्वितीय बक्षीस कावेरी बालाजी झाडे हिला मिळाले आहे. ती नगर परिषद शाळा क्रमांक ७ वणीची विद्यार्थीनी आहे. तिला 2 हजार रुपये रोख हे बक्षीस स्वरूपात मिळाले आहे. तर तृतीय बक्षीस श्रद्धा विजय जुनघरे हिला मिळाले आहे. ती वर्ग ८ची जनता विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिला 500 रुपये रोख बक्षीस स्वरुपात मिळाले आहे.

तर ब गट हा खुला गट होता. यात प्रथम बक्षीस प्रसेनजीत भारत खैरे या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील बीएच्या विद्यार्थ्याला मिळाले आहे. यात द्वितीय बक्षीस प्रतीक प्रदीप राणा, जगन्नाथ बाबा महाविद्यालय, वणी याला मिळाले आहे. तर तृतीय बक्षिसाचा मानकरी संजय प्रभाकर कुचनकर हा ठरला आहे. तो लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील बीएस्ससीचा विद्यार्थी आहे. त्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार आणि पदक असे बक्षीस मिळाले आहे.

हेल्पिंग हॅन्ड हा गृप एक सामाजिक उपक्रम राबवणारा गृप असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा गृप वणी आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवतो. मोफत, कोचिंग, गरजु मुलांना वह्या पुस्तके वाटणे, स्पर्धा परीक्षा इत्यादी उपक्रम या गृप तर्फे राबवण्यात आलेले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.