बहुगुणी डेस्क, वणी: उकणी येथील घनश्याम विश्वनाथ खाडे (72) यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती अवस्थामुळे नागपूर येथे भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा 3 वाजताच्या सुमारास त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ते संजय खाडे यांचे चुलत बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी स. 10 वा. उकणी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा च्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.