सरकीच्या ढिगा-याखाली दबून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वणी एमआयडीसी परिसरातील मिलमधली घटना

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरातील ऑइल मिल कंपनीत सरकीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ओमवती थानसिंग धुर्वे, असे मृत बालिकेचे नाव आहे. एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे.

मुलीची आई ही स्वस्तिक ऑइल मिलमध्ये कामाला आहे. तर वडील थानसिंग हे गवंडीकाम करतात. मृत ओमवती ही ऑईल मिलच्या आवारात मजुरांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात कुटुंबासह वास्तव्यास होती. शनिवारी ओमवती ही घरी नव्हती. मात्र परिसरात कुठे खेळत असेल म्हणून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र संध्याकाळी देखील ती न दिसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री 10 वाजताच्या सुमारास एका मजुराला सरकीच्या ढिगाऱ्याखाली एक हात दिसून आला. मजुरांनी सरकीचा ढिगारा बाजूला करून पाहिले असता तिथे ओमवतीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तातडीने वणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थळ पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास वणी ठाणेदार बेहराणी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

Comments are closed.