बहुगुणी डेस्क, वणी: सिनेमात बेडवर उशी, लोड यावर पांघरून टाकून कुणीतरी झोपले असल्याची बतावणी केल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. पळून जाण्यासाठी ही आयडीया सिनेमात नेहमीच वापरी जाते. मात्र असाच काहीसा फिल्मीस्टाईल प्रकार मारेगाव तालुक्यात समोर आला. मावशीच्या घरी आलेली भाची हीच फिल्मी ट्रिक वापरत घरून बाहेर निघाली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या मावशीने याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी ही पीडित मुलीची मावशी असून ती मारेगाव तालुक्यातील एका गावात कुटुंबीयांसह राहते. ती शेतीचे काम करते. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्या घरी त्यांची बाहेरगावाहून आलेली त्यांची भाची (17 वर्ष) राहत होती. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री घरातील सर्व व्यक्ती जेवण झाल्यानंतर झोपले होते. त्यांची भाची देखील अंगावर पांघरून घेऊन झोपी गेली होती. मंगळवारी सकाळी 6 वाजता जेव्हा मुलीची मावशी उठली, तेव्हा तिला त्यांची भाची अंगावर पांघरून घेऊन झोपलेली आढळली.
मावशीने घरचे सकाळचे कामं संपवले. मात्र रोजचा वेळ झाला तरी त्यांची भाची काही उठली नाही. त्यांनी अनेकदा भाचीला आवाज देऊन उठ म्हटले. मात्र त्याला भाचीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मावशीला संशय आल्याने ती गादीजवळ गेली. तिने पांघरून बाजूला सारले. तर तिथे तिला उशी, लोडवर चादर पांघरलेली आढळली. तिथे भाची नव्हतीच. मावशीने आजूबाजूला भाचीची चौकशी केली. मात्र तिचा काही शोध लागला नाही. तिने पीडित मुलीच्या आई वडिलांना देखील कॉल लावला. मात्र ती त्यांच्या गावी देखील पोहोचली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
अखेर एका शेजा-याने ती भल्या सकाळी शौचास जाताना दिसली अशी माहिती दिली. मुलीच्या मावशीने तिचा परिसरात शोध घेतला. मात्र तिचा काही पत्ता लागला नाही. अखेर त्यांना तिला कुणीतही फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. मावशीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. अखेर अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्य कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Comments are closed.