बहुगुणी डेस्क, वणी: नारायण निवास जवळ राहणारे उमेश पुरुषोत्तम राजूरकर यांचे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. उमेश मुकुटबन रोडवरील एका रेस्टॉरन्टमध्ये काम करीत होता. तो त्याच्या आई व बहिणीसह नारायण निवास मागे असलेल्या घरी राहत होता. 10 दिवसांआधी उमेशच्या आईचे निधन झाले होते. बुधवारी उमेश कामाला गेला होता. रात्री तो कामाहून घरी परत आला. सुकणेगावला उमेशच्या आईचा तेरवीचा कार्यक्रम असल्याने त्याची बहिण गावी गेली होती. आज गुरुवारी दिनांक 24 एप्रिल रोजी तेरवीचा कार्यक्रम होता. मात्र बराचे वेळ झाला तरी उमेश गावी पोहोचला नाही. तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने उमेशचा भाऊ घरी गेला. तिथे त्याला उमेश मृतावस्थेत बेडवर पडून आढळला. उमेश याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र उष्माघाताने तर उमेशचा बळी घेतला नाही, अशी परिसरात चर्चा सुरु आहे. 5 वर्षाआधी उमेशच्या पत्नीचे दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यामुळे उमेश खचला होता. आईच्या तेरवीच्या दिवशीच उमेशचा मृत्यू झाला. वणीतील अनेक रेस्टॉरन्टमध्ये उमेशने काम केले होते. मृदू व मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून तो ओळखला जायचा. त्याच्या एका एकी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उमेशच्या पश्चात दोन मुली, भाऊ बहिण, भाचे, पुतणे असा मोठा आप्त परिवार आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.