जनावरे नेताना वाहने पकडली, 33 जनावरे ताब्यात
सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त, वणीतील 10 जणांना अटक
रफिक कनोजे, मुकुटबन: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत घोन्सा बीटमधील दहेगाव शिवारातील दहेगाव रोडवर गोतस्करी करणा-यांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता सहा चार चाकी वाहनांमध्ये निर्दयतेने ३३ जनावरे कोंबून नेताना पकडण्यात आले. यात अकरा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या सहा वाहनांमध्ये पाच टाटा एस वाहन असून एक पिक अप बोलेरो गाडी आहे. या वाहनांची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे. 33 जनावरांपैकी 16 म्हैस, 12 वगार, 5 रेडे आहेत यांची किंमत 3 लाख 33 हजार असे एकूण 17 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांना नाग गोरक्षण संस्थेत टाकण्यात आले आहेत.
या कार्यवाहीत शेख छोट्टु शेख अमीर (५७), सय्यद रफिक सय्यद गुलाब (२८) सय्यद शकील सय्यद जमाल (४५), शेख दाऊद इब्राहिम शेख मो.रफिक (२८) सय्यद ननु सय्यद जमाल(५५), अकबर दौलतखान पठाण (३७), शेख शम्मू शेख पठाण (३८), शेख इमरान शेख शकील (२६), शेख शकील शेख रसूल (५५), शेख सद्दाम शेख गणी (२३) सर्व राहणार रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला वणी येथील आहेत. तर अमोल गुलाबराव घुगुल (२७) रा. नेरड ह्या 11 लोकांवर कलम 119 व 83/177 नुसार कारवाई करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश ताजने जमादार, मारोती टोंगे जमादार, ताडकोकुलवार, सुलभ उईके, प्रदीप कवरासे व इतर कर्मचारी करीत आहे.