बक-या राखणा-याला जातीवाचक शिविगाळ करीत बेदम मारहाण

शेळकी गंभीर जखमी, ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: बकऱ्या चारण्यावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याने बकरी राखणा-याला जातीवाचक शिविगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. मारेगाव तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीवर ऍट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी अशोक सातपुते हे नरसाळा ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. ते गेल्या तीन महिन्यांपासून खडकी येथील विनोद कोयचाडे यांच्याकडे बकऱ्या चारण्याचे काम करतात. 15 जुलै 2025 रोजी दिवसभर बक-या राखल्यानंतर ते सायंकाळी 6:30 वाजता गावातील लक्ष्मीताई मंदिराजवळील पानटपरीसमोर बसले होते. दरम्यान तिथे अशोक रामचंद्र ढवस (वय 55, कुणबी, रा. खडकी) आले. त्यांनी अशोक सोबत बक-या राखण्यावरून वाद घातला. ढवस यांनी सातपुते यांना बकऱ्या आपल्या शेतात येऊन पिकांचे नुकसान करत असल्याचा आरोप केला.

या वादातून ढवस यांनी सातपुते यांना जातीवाचक शिविगाळ करीत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले. तसेच छाती व कंबरेवर हल्ला केला. तुझ्या बकऱ्या पुन्हा शेतात आल्या तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सातपुते यांना वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. तपासणीत सातपुते यांच्या छातीचे दोन हाडे तुटल्याचे निष्पन्न झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राथमिक उपचारानंतर सातपुते यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अशोक ढवस यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 352, 351(3), 117(2) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 च्या (ऍट्रोसिटी) कलम 3(1)(r), 3(2)(va), 3(1)(s) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.

धक्कादायक – सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

Comments are closed.