वणीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गोदावरी अर्बनतर्फे सन्मान

शाखेत 7 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, गुरुवारी दिनांक 30 मे रोजी 7 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दहावी व बारावीत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिरपूर व वणी पोलीस स्टेशनला बॅरिकेट्सचे वितरण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा होते तर प्रमुख अतिथी म्हणून वणी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. गोदावरी अर्बन ही सोसायटी प्रगती पथावर असून त्यात वणी शाखेचे मौलिक योगदान आहे असे मनोगत राकेश खुराना यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन राजू गव्हाणे, प्रास्ताविक वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर उपस्थितांचे आभार सुरज चाटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, तुषार ठाकरे, कनिष्ठ अधिकारी प्रांजली ठाकरे, सूरज चाटे, मंगेश करंडे, अमोल देऊळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार यांनी परिश्रम घेतले. यावेळी समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता, ठेवीदार, ग्राहक आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलीस स्टेशनला बॅरिकेट्सचे वाटप

गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, उप महाव्यवस्थापक दवे, तसेच सहायक महाव्यवस्थापक रवि इंगळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.

Comments are closed.