श्री गोपाळराव श्रीहरीपंत दिकुंडवार यांचे निधन
बिल्डर व व्यावसायिक किरण दिकुंडवार यांना पीतृशोक
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिद्ध बिल्डर आणि डेव्हलपर किरण दिकुंडवार यांचे वडील, गोपाळराव श्रीहरीपंत दिकुंडवार यांचे आज, बुधवार, 9 जुलै 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह स्थानिक समाजात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी 3:00 वाजता मोक्षधाम, वणी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा रवि नगर येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व आप्तपरिवार आहे. वणी बहुगुणी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments are closed.