सूर्यवीर चिकटे यांची युवक आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
वणीत उत्साहात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने 29 जून 2025 रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात वणी, मारेगाव आणि झरी-जामनी तालुक्यांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकांचे नियोजन, युवक सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा वर्षा निकम होत्या, तर प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव घारपडकर यांनीही विशेष सहभाग नोंदवला. या बैठकीत युवक नेतृत्वाला चालना देण्याच्या उद्देशाने सूर्यवीर चिकटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.
या बैठकीला अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शकील अहमद, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सय्यद अहमद, प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबीद हुसेन, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष सय्यद शकील, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments are closed.