कोरोनामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी जोमात

शासकीय कर्मचारी व अधिका-यांची 24 तास सेवा

0

सुशील ओझा, झरी: देशात कोरोना विषाणूची दहशत पसरली असून महाराष्ट्रात रुग्णाची संख्या जास्त प्रमाणात असल्याने शासनाकडून याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुशार कोरोनावर मात करण्याचे आदेशानुसार उपाययोजना केल्या जात आहे. जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्याकरिता तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र झटत आहे.

तालुक्यात तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस विभाग, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सभापती, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्रामपंचायत सचिव, सदस्य व  कर्मचारी सर्व आरोग्य कर्मचारी तसेच सर्व तालुक्यातील काही पत्रकार व महसुल विभागाचे तलाठी कोतवाल व कर्मचारी वृंद सर्वजण आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करीत आहे.

तालुक्यात तहसीलदार जोशी नायब तजसीलदार रामचंद्र खिरेकर, मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने, पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे, पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश मोरे गटविकास अधिकारी सुधाकर जाधव सहा गटविकास अधिकारी इसलकर तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, डॉ पंडित यांच्या नेतृत्वात कोरोना विषयी तालुक्याचे काम उत्तम पार पडत आहे.

 

सर्व विभागातील कर्मचारी आपल्या अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत घरोघरी फिरून माहिती घेणे तपासणी करणे सुरू आहे. जनतेला कोणत्याही प्रकारची समस्या भासणार नाही याकडे सर्व अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेऊन आहे. पाटण व मुकूटबन ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करीत जनतेला घरात राहण्याचे विनंती करीत फिरत आहेत. पोलीस गाडीमधून स्पीकर लावून माईकद्वारे जनजागृतीचे काम करीत आहे.

बाहेर राज्यातील किंवा तालुक्यातील १०६ गावातील गरजू व गोरगरीब जनतेच्या जेवणाच्या समस्येकडे वरील अधिकारी विशेष लक्ष देऊन त्यांना सर्व सुविधा पुरविण्याचे कार्यसुद्धा मोठया प्रमाणात करीत आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी गाव स्वच्छतेकडे लक्ष देताहेत. आशा वर्कर घरोघरी फिरून माहिती गोळा करणे ग्रामपंचायत सचिव दिवसभर कार्यालयात हजर राहून गावातील निर्जंतुकरन करणे व इतर आरोग्याविषयी उपाययोजना करीत आहे. जनतेच्या सुरक्षेकरिता झटणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या २४ करीत असलेल्या कामाला नक्कीच सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.