शेतकऱ्यांचे धान्य चोरी करून विकणाऱ्यास अटक

5 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानीय गुन्हे शाखेचे कारवाई

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरदरा शेतशिवारातून 3 क्विंटल चना चोरी करून वणी येथे विकणाऱ्या चोरट्यास वणीतून स्थानीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोबतच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर चोरी ही 7-8 महिन्यांपूर्वी झाली असून याबाबत तेव्हा तक्रार दाखल करण्यात आली होती. या कारवाईत 30 हजारांचा चणा व 5 लाखांचे पिकअप वाहन असा एकूण 5 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   

सविस्तर वृत्त असे की शेतमालक वसंता रामचंद्र मोहितकर रा. पुरड यांची हिवरदरा येथे शेती आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी त्यांच्या शेतात निघालेला चणा शेतातील बंड्यात ठेवला होता. 11 एप्रिल 2022 च्या मध्यरात्री चोरट्यांनी मोहितकर यांच्या शेतात प्रवेश करत त्यांच्या शेतात ठेवलेल्या 15 बोरी चण्यापैकी 6 बोरी चणा (3 क्विंटल) चोरून नेला होता. याबाबत शेतमालकाने मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 461, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

स्थानीय गुन्हे शाखा (LCB) यांना चोरीचा चणा विकला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी विचारपूस केली असता त्यांना सदर चणा आरोपी शेख अकिल शेख रसूल (50) रा. खडबडा याने विकल्याची माहिती मिळाली. त्यावरून एलसीबीने आरोपीला घरी जाऊन अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याच्यासोबत खडकडोह येथील आणखी तीन अनोळखी इसम असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. 

सदर चना हा वणी येथील एका व्यापाऱ्याला विकल्याची व या गुन्ह्यात पिकअप वाहन उपयोगात आणले गेले. त्यामुळे स्थानीय गुन्हे शाखेने आरोपी व वाहन हे ताब्यात घेऊन मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. घटनेचा तपास गजानन भांदककर करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, प्रदीप परदेशी पोलीस अधीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल कडू, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, महेश जाधव, सुधीर पिदूरकर, महेश फुके यांनी केली.

https://wanibahuguni.com/waninews/scrap-thieves-ttack-guard-with-iron-rod-wcl/

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.