सिद्धार्थ वसतीगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सिद्धार्थ वसतीगृहात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एसएस सोनारखन होते. तर नवनाथ नगराळे, जगदिश भगत, भाऊराव मजगवळी, ऍड दौलतराव वानखेडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर वसतिगृहातील मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव नवनाथ नगराळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्रा. सोनारखन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतीगृहाचे सेवक कैलास वडस्कर यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed.