ग्रामपंचायत चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात बक्षीस वितरण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे न्यू एलेवन क्रिकेट क्लब तर्फे ग्रामपंचायत चषक राज्यस्तरीय शहरी व ग्रामीण स्तरीय क्रिकेटचे सामन्याचे आयोजन आदर्श हायस्कुलच्या मैदानावर घेण्यात आले होते. चषक सामन्याचे अंतिम (फायनल) सामना ९ डिसेंम्बर ला झाला त्यात प्रथम, द्वितीय बक्षीस व इतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दिनांक २६ नोव्हेंबर पासून ही स्पर्धा सुरू होती.

राज्यस्तरीय शहरी भागातील क्रिकेट संघात प्रथम बक्षीस १ लाख, दुसरे बक्षीस ५० हजार तर ग्रामीण क्रिकेट संघात प्रथम बक्षीस १५ हजार तर दुसरे बक्षीस १० हजार ठेवण्यात आले होते. राज्यस्तरीय शहरी विभागातून १ लाखाचे प्रथम बक्षीस क्रिकेट संघ अमरावतीला सरपंच व ग्रामपंचायत सदस्या कडून वर्गणी काढून देण्यात आले, ५० हजारांचे द्वितीय बक्षीस क्रिकेट संघ मुंबईला देण्यात आले. ग्रामीण विभागातून प्रथम बक्षीस १५ हजार न्यु एलेवन क्रिकेट संघ मुकूटबन तर दुसरे बक्षीस १० हजार रुपये क्रिकेट संघ बोटोनीला देण्यात आले.

बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शंकर लाकडे , ठाणेदार धनंजय जगदाळे , कपिल शृंगारे , उपसरपंच आगुलवार , वैद्यकीय अधिकारी अजय जोगदंड, प्रकाश मॅकलवार, रमेश एलपुलवार, करम बघेले, दशरथ विधाते, राजू वनकर, सुरेन्द्र गेडाम, मधुकर चेलपेलवार, सुरेश ताडूरवार सर्व ग्रामपंचायत सदस्य व ईतर मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन दिलीप एनगंधेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेम नरडलवार यांनी केले.

बक्षीस वितरणाच्या वेळेस प्रेम नरडलवार गणेश उदकवार यांच्यासह युवकांची मागणी होती की मुकूटबन येथे हक्काचे व स्वतःचे एक क्रिकेट मैदान आवश्यक असून युवकांना मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सरपंच शंकर लाकडे यांनी तरण युवका करिता क्रिकेट मैदान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असून मी प्रयत्नशील आहोत आणी दिलेले आश्वासन पूर्ण करीन अशीही ग्वाही लाकडे यांनी दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.