जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी ग्रामपंचायतीत ग्रामसचिवाची पुर्णत: नियुक्ती करण्यात आली नसल्याने मागील अनेक दिवसांपासुन बोटोनी ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प पडला आहे. मागील एक वर्षापासुन येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक मंचलवार हे या ना त्या कारनाने वादग्रस ठरले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही सुद्धा झाली. पण ग्रामपंचायतीची सुत्रे सांभाळण्यासाठी ग्रामसचिवाला पुर्णत: अधिकार देण्यात आले नाही. खाते बदल झाला नाही.
मंचलवार यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेले कामे अजुनपर्यंत पूर्ण झाले नाही. गावातील अंतर्गत राजकारणामुळे बरेच ग्रामसचिव येथील प्रभार घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे राजकीय वर्चस्वाच्या चढाओढीत ग्रामविकास पुरता ठप्प पडल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसचिव हे गावाचे प्रशासकीय प्रमुख असल्याने शासनाचा मुख्य दुवा असते. ग्रामसचिवाशिवाय गावातील विकासकामांची गती मंदावली आहे सोबतच ग्रामस्थांचे प्रश्न देखील प्रलंबित आहे.
सदर बाबीचा लवकरात लवकर निपटारा करून ग्रामविकासात अडथडे निर्माण होणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.